#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार

नवी दिल्ली : ”नव्या कृषी कायद्यानुसार, तीन दिवसात शेतकऱ्यांना तीन दिवसात त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची तरतूद केली आहे. तीन दिवसात पैसे न मिळाल्यास ते ताक्रात करू शकतात. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांची अनेक बंधने दूर झाली आहेत. तसेच त्यांना या कायद्याद्वारे नव्या संधीदेखील मिळणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”संसदेने कृषी कायद्यात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली असून त्याद्वारे शेतकर्‍यांना त्यांचे हक्क मिळाले आहेत. तसेच, वर्षानुवर्षे त्यांनी केलेल्या मागण्यादेखील पूर्ण केल्या आहेत. योग्य माहिती शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तसेच, शंभर वर्षांपूर्वी चोरीला गेलेली देवी अन्नपूर्णा देवीची मूर्ती परत आणली जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी 1913 मध्ये काशी येथील मंदिरातून माता अन्नपूर्णाची मूर्ती चोरी केली गेली होती आणि परदेशात नेली गेली होती, जी आता परत आणली जात आहे. याबाबत पीएम मोदी यांनी भारताचा वारसा परत देण्यात मदत केल्याबद्दल कॅनडा सरकारचे आभार मानले. तसेच, काही काळापूर्वी, जागतिक वारसा सप्ताहानिमित्त, भारताने आपल्या सांस्कृतिक वारसा जपण्याचा दृढनिश्चय केला आहे. असेही त्यांनी सांगितले.

अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असेल, असंही ते म्हणाले.