बातमी महाराष्ट्र

मराठा समाजातील तरुणांवर पोलीस भरतीत अन्याय होणार नाही ही सरकारची जबाबदारी : गृहमंत्री

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रात मेगा पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीत राज्यातील मराठा समाजावर अन्याय होणार नाही याची सर्वस्वी जबादारी सरकारची आहे. या भरतीत योग्य ती काळजी सरकारकडून घेतली जाईल अशी हमी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या साडेबारा हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यात संधी मिळणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशमुख म्हणाले, साडे बारा हजार भरती करता किमान २५ लाख अर्ज येतील आणि संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार आहेत. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका राहणार आहे.

राज्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस स्थगिती दिली असल्यानं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे भरतीला विरोध होऊ लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत