बातमी मराठवाडा

डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; नांदेड येथे शनिवार पुरस्कार प्रदान करण्यात येणार

बोधी फाऊंडेशनच्या वतीने बहिष्कृत, शोषितांच्या प्रश्नांवर विनातडजोड कार्यरत असलेल्या जातीनिर्मूलनवादी जीवनदृष्टीशी बांधलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मानादर करण्यासाठी बोधी जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रोख रक्कम पंधरा हजार आणि सन्मान चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप राहिल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डाॅ. व्यंकटेश काब्दे माजी खासदार, नांदेड यांच्या विशेष उपस्थित नरहर कुरूंदकर सभागृह, पीपल्स काॅलेज, नांदेड येथे शनिवारी 25 डिसेंबर 2021, दुपारी 12 वाजता डाॅ. भारत पाटणकर यांना हा जीवनगौरव पुरस्कार आणि नांदेड येथील समविचारी पुरोगामी संघटनांच्यावतीने संयुक्त मानपत्र प्रदान करण्यात येईल यासोबतच मनुस्मृती जाळल्याच्या दिनानिमीत्त मनुस्मृतीच्या विरोधकांची वाटचाल याविषयार विशेष व्याख्यान देण्यासाठी अथिती वक्त्या : डाॅ. वंदना सोनाळकर, स्त्रीवादी अर्थतज्ञ, (मुंबई) यांना निमंत्रित केले आहे.

बोधी फाऊंडेशनच्या महाराष्ट्र कार्यकारी समितीच्या धम्मसंगिनी रमागोरख -नागपूर, प्रियंका भापकर- कोल्हापूर, संबोधी देशपांडे -चोपडा, किशोर पाटील, पल्लवी हर्षे-पुणे, डाॅ. रत्नदीप सोनकांबळे- नांदेड, सुचिता कसबे- औरंगाबाद, प्रा. सुनिल गायकवाड- सातारा आदी सदस्यांनी एकमताने डाॅ. भारत पाटणकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी बोधी फाऊंडेशनच्या वतीने नांदेड येथील पुरोगामी चळवळीतील सन्माननीयांचा सहभाग असलेली ‘भारत पाटणकर जीवनगौरव समीती’ स्थापन केली असल्याचे बोधी फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. भारत पाटणकर हे जग बदलून इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरक व्यक्तिमत्व आहे. जमिनीसंघर्षासोबतच विदुषी गेल आॅमवेट यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रातील जातीनिर्मूलनवादी विचारविश्व अधिक सकस करण्यात योगदान दिले आहे.

प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, विस्थापितांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर काम करणार्या डाॅ. भारत पाटणकरांशी मराठवाड्यातील समतावादी कार्यकर्त्यांना वैचारिक- भावनिक नाते या निमित्ताने अधिक ठळक करण्याची संधी मिळाली असल्याचे सत्यशोधक घरकामगार संघटनेच्या नेत्या मा. सुप्रिया गायकवाड- सत्यशोधक घरकामगार संघटना, राहुल प्रधान- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आजाद समाज पार्टी, अॅड. अरविंद देशपांडे- कष्टकरी संघटना, नांदेड, बालाजी थोटवे- प्रदेशाध्यक्ष लसाकम, प्रा.संजयकुमार मांजरमकर- अध्यक्ष, अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य.अल्ताफ हुसेन -मुव्हमेंट फाॅर पीस् अन्ड जस्टीस, नांदेड, प्रा.डाॅ. सूर्यकांत जोगदंड- एमफुक्टो /अधीसभा सदस्य- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड प्रा. डी. एन मोरे- स्वामुक्टा, डाॅ.अशोक सिध्देवाड- समाजवादी अध्यापक सभा , काॅ. प्रदीप नागापूरकर -भाकप व जिल्हा मराठी पत्रकार संघटना,काॅ. इरवंत रा.सुर्यकर- राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी, प्रा. रामचंद्र भरांडे- लोकस्वराज्य आंदोलन, मंजुश्री कबाडे- माकप , मुखेड प्रा. सम्राट हटकर- अंनिस, राजू पाटील – बसव विचार प्रतिष्ठान, प्रा. सी.एल. कदम- जिल्हा अध्यक्ष लसाकम नांदेड, डाॅ. ललिता अलसटवार -राष्ट्र सेवा दल, बालाजी कुंपलवार -बाभळी बंधारा कृती समिती, कैलास येसगे कावळगावकर-प्रहार, देगलूर, प्रकाश मोगले (साहित्यीक) डाॅ. आदिनाथ इंगोले (माकप), प्रा. डाॅ. राजेंद्र गोणारकर, प्रा. नाना शिंदे, डाॅ. सचिन सरोदे डाॅ. विकास वाठोरे, डाॅ. मिलींद पांढुर्णीकर, सिध्दार्थ सोनकांबळे (नांदेड ) सुमेध सोनकांबळे, डाॅ. सुधाकर जाधव, उदय कदम, (देगलुर), मनोहर वाघमारे, धम्मानंद सोनकांबळे, (नायगाव) काॅ. विनोद गोंविदवार (मुखेड) आदींनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.