BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश; नांदेड येथील केसीआर यांच्या सभेला मोठी गर्दी
बातमी मराठवाडा

BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश; नांदेड येथील केसीआर यांच्या सभेला मोठी गर्दी

नांदेड : तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देशभर पक्ष विस्ताराकरिता त्यांनी प्रथम महाराष्ट्राची निवड केली. तेलंगणाच्या सीमेपासून जवळ असलेल्या नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची काल जाहीर सभा झाली. महाराष्ट्रातील चार माजी आमदार यांनी मुख्यमंत्री के सी आर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पार्टीमध्ये प्रवेश केला आहेत. याशिवाय राज्यातील महत्त्वाचे नेते हेही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यामुळं भारत राष्ट्र समितीची राज्यात एंट्री झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील दिगंबर भिसे या चार माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. याशिवाय राजन कोडक, संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे व ढोलीराम काळदाते या महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 5 झेडपी सदस्यांनी BRS पक्षात प्रवेश केला. यासाठी राज्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा प्रवेश केला.

नांदेड येथील सभेला मोठी गर्दी
नांदेड येथील सभेला मोठी गर्दी झाली होती. के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली. तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयाला हात घातला. महाराष्ट्रात केसीआर यांच्या आणखी सभा होणार आहेत. त्यामुळं ठिकठिकाणी भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा मिळू शकतो. वेगळा विदर्भ, मराठवाडा अशी मागणी घेऊन बीआरएस राज्यात उतरू शकते.