बातमी मराठवाडा

मा.खासदार डॉ.सुनील गायकवाड यांना नेताजी सुभाष चंद्रबोस पीस अवार्ड प्रदान

मुंबई : लातूरचे लोकप्रिय माजी खासदार संसद रत्न डॉक्टर प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड्स मुंबई यांच्याकडून दिला जाणारा यावर्षीचा नेताजी सुभाषचंद्र बोस पीस अवॉर्ड – २०२२. मुंबईच्या हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये या अवार्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे लातूर लोकसभा मतदारसंघाचे सोळाव्या लोकसभेचे खासदार म्हणून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेले आहे.त्याबद्दल त्यांचा यापूर्वी अनेक अवार्ड देऊन गौरव करण्यात आलेला आहे. प्रामुख्याने संसद रत्न पुरस्कार,भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवार्ड ,डॉक्टर बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवार्ड, इंटरनॅशनल बुद्धा पिस अवार्ड, लोर्ड बुद्धा अवार्ड, समाज सेवी सन्मान,अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

सन २०२२ चा नेताजी सुभाष चंद्र बोस पीस अवॉर्ड हा अत्यंत मानाचा पुरस्कार देशातील अनेक मान्यवरांना देण्यात आला आहे . यावर्षी चा डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना हा पुरस्कार भारतीय सिनेमातील दिग्गज कलाकार गायक अभिनेते अरुण बक्षी, अभिनेते पंकज ,अभिनेते पुरी अभिनेते अली खान, मुंबई चे ज्येष्ठ संपादक आणि कामगार चळवळीचे नेते अभिजीत राणे, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात माननीय नरेंद्र मोदी जी यांची भूमिका केलेले अभिनेते विकास महंते यांच्या प्रमुख हस्ते डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

16 व्या लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि देशात अनेक ठिकाणी विश्व दलित परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने समाजा समाजामध्ये प्रेमाचे आणि शांततेचे संबंध ठेवण्याचे काम डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केल्यामुळे आणि लातूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे केल्यामुळे दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड या संस्थेने दखल घेऊन हा प्रतिष्ठित अवार्ड दिग्गज कलाकारांच्या हस्ते शानदार अशा कार्यक्रमात देण्यात आला.

डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस पीस अवॉर्ड पुरस्काराबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.