माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवॉर्ड” प्रदान
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवॉर्ड” प्रदान

लातूर : लातूरचे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना बाबु जग जीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली चा २०२१ चा “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवार्ड” नुकताच लुंबिनी येथे पार पडला.या कार्यक्रमाला कोविड मुळे डॉ गायकवाड यांना जाता आले नसल्यामुळे अकादमीचे प्रतिनिधी प्रोफेसर गोरख साठे यांनी आज लातूर ला डॉ सुनील गायकवाड यांच्या निवासस्थानी येऊन सन्मान पूर्वक प्रदान केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लोकसभा च्या पूर्व सभापती मीरा कुमार यांच्या मार्गदर्शाखाली बाबू जगजीवराम कला संस्कृती आणि साहित्य अकदामी दिल्ली चे कार्य सुरू असून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनेला पुरस्कार दिला जातो.

डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत उत्कृषटरित्या काम करून आपला ठसा संसदेत उमटवला आहे. त्यांना संसद रत्न पुरस्कारानी सम्मानित केले आहे. नुकताच ” वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस” नी १६ व्या लोकसभेतील उच्च शिक्षित खासदार म्हणून नोंद करून त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. लातूर मध्ये खासदार असताना अनेक समाज उपयोगी कामे केली प्रामुख्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, नीट परिक्षा केंद्र, रेल्वे बोगी कारखाना, रेल्वे स्टेशन लातूर रोड, रेल्वे स्टेशन उदगीर ला दादरा चे काम पूर्ण करून उदगीर ला नवीन प्लॉट फॉर्म आणि लातूर रोड, लातूर ला प्लॉट फॉर्म आणि जवळपास २१ नवीन ट्रेन सुरु केले . लातूर जिल्ह्यात नॅशनल हाई वे चे काम करून घेतले. असे अनेक काम खासदार असताना केलेली दखल घेऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अनेक पुरस्कारानी सम्मानित केले आहे.

त्यात प्रामुख्याने , लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल पीस अवॉर्ड- बांगला देश, लॉर्ड बुद्धा पिस अवॉर्ड भारत म्यानमार दिल्ली, समाज सेवी सन्मान राज भवन मुंबई, राष्ट्रीय समाज सेवा रत्न,मध्य प्रदेश , छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड, मुंबई,इंडियन स्टार्स अवॉर्ड, मुंबई, लोकमत आयकॉन ऑफ लातूर, डॉ बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड, नेपाल- दिल्ली,संसद रत्न अवॉर्ड- दिल्ली, भारत रत्न डॉ आंबेडकर अवॉर्ड- मुंबई, लॉर्ड बुद्धा नॅशनल अवॉर्ड दिल्ली, भारत ज्योती राष्ट्रीय अवॉर्ड दिल्ली, डॉ शामा प्रसाद मुखर्जी अवॉर्ड -दिल्ली, भारत शौर्य अवॉर्ड -दिल्ली, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चा जीवन गौरव पुरस्कार-२०२१, भारतीय समाज रत्न दिल्ली, अनाथ पिंडक इंटरनॅशनल अवॉर्ड- कर्नाटक, धम्म गौरव पुरस्कार- नासिक, दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतळगिरी कडून गौरव सन्मान, पत्रकारिता चे सतत तीन दर्पण पुरस्कार, असे अनेक पुरस्काराची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव परदेशात व्हावा म्हणून नेपाल – इंडिया मैत्री इंटरनॅशनल पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.