बातमी मराठवाडा

इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी दिल्लीच्या “भारत ज्योती अवॉर्ड” नी मा खा डॉ. सुनील गायकवाड सम्मानित

दिल्ली : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना आज इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी चा अत्यंत मानाचा पुरस्कार “भारत ज्योती अवॉर्ड” देऊन तमिळनाडू च्या राज्यसभा खासदार डॉ शशिकलापुष्पा रामास्वामी यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सम्मानित करण्यात आले.इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी दिल्ली ही संस्था आज पर्यंत देशातील अनेक मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इकॉनॉमीक ग्रोथ अँड नॅशनल इंटिग्रेशन या विषयावर आज दिल्ली येथे सेमिनार घेण्यात आला.देशाच्या जवळपास सगळ्या राज्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.प्रामुख्याने जे असामान्य असे कार्य करणाऱ्या काही निवडक महिला आणि पुरुष यांना दर वर्षी भारत ज्योति अवॉर्ड दिला जातो.

यापूर्वी हा राष्ट्रीय प्रतिष्ठित अवॉर्ड प्रसिद्ध समाज सेविका मदर तेरेसा,पूर्व उप राष्ट्रपती बी डी जत्ती,राज्यपाल गुरुमित सिंह उत्तराखंड चे राज्यपाल, वाजुभाई वाला ,पूर्व राज्यपाल इक्बाल सिंह,पूर्व राज्यपाल डॉ डी वाय पाटील,पूर्व निवडणूक आयुक्त जी वी जी कृष्णमूर्ती,पूर्व मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश प्रेमकुमार धुमल,पूर्व शिक्षा मंत्री भारत सरकार डॉ रमेश पोखरियाल निषाद, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ बी के गोयल,प्रसिद्ध अभिनेते तथा माजी केंद्रीमंत्री सुनील दत्त, अभिनेता देव आनंद, अभिनेता प्राण, अभिनेता शम्मी कपूर, अभिनेता राजेंद्र कुमार, अभिनेता राजेश खन्ना, प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमनियंम, उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर चेतन चौहान, क्रिकेटर सुनील गावसकर, क्रिकेटर सईद किरमनी, ऑलिंपिक विजेता अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले अशा समाजातील विविध मान्यवर यांना “भारत ज्योती अवॉर्ड” नी गौरव करण्यात आला आहे.

असा प्रतिष्ठित “भारत ज्योती गौरव अवॉर्ड २०२१ “देऊन दिल्ली येथील भव्य अशा कार्यक्रमात इंडिया इंटनॅशनल सेंटर, मल्टी पर्पज हॉल, न्यू बिल्डिंग लोधी गार्डन न्यु दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, दिल्ली चे महासचिव गुरुप्रित सिंह यांनी खास आग्रह करून हा पुरस्कार स्वीकरण्या साठी डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना विनंती केली होती.

डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत उत्कृष्टरित्या काम करून आपला ठसा संसदेत उमटवला आहे. त्यांना संसद रत्न पुरस्कारानी सम्मानित केले आहे. नुकताच ” वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस” नी १६ व्या लोकसभेतील उच्च शिक्षित खासदार म्हणून नोंद करून त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. लातूर मध्ये खासदार असताना अनेक समाज उपयोगी कामे केली प्रामुख्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, नीट परिक्षा केंद्र, रेल्वे बोगी कारखाना, रेल्वे स्टेशन लातूर रोड, रेल्वे स्टेशन उदगीर ला दादरा चे काम पूर्ण करून उदगीर ला नवीन प्लॉट फॉर्म आणि लातूर रोड, लातूर ला प्लॉट फॉर्म आणि जवळपास २१ नवीन ट्रेन सुरु केले . लातूर जिल्ह्यात नॅशनल हाई वे चे काम करून घेतले. असे अनेक काम खासदार असताना केलेली दखल घेऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अनेक पुरस्कारानी सम्मानित केले आहे.

त्यात प्रामुख्याने , लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल पीस अवॉर्ड- बांगला देश, लॉर्ड बुद्धा पिस अवॉर्ड भारत
म्यानमार दिल्ली, समाज सेवी सन्मान राज भवन मुंबई, राष्ट्रीय समाज सेवा रत्न,मध्य प्रदेश , छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड, मुंबई,इंडियन स्टार्स अवॉर्ड, मुंबई, लोकमत आयकॉन ऑफ लातूर, डॉ बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड, नेपाल- दिल्ली,संसद रत्न अवॉर्ड- दिल्ली, भारत रत्न डॉ आंबेडकर अवॉर्ड- मुंबई, लॉर्ड बुद्धा नॅशनल अवॉर्ड दिल्ली, भारत ज्योती राष्ट्रीय अवॉर्ड दिल्ली, डॉ शामा प्रसाद मुखर्जी अवॉर्ड -दिल्ली, भारत शौर्य अवॉर्ड -दिल्ली, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चा जीवन गौरव पुरस्कार-२०२१, भारतीय समाज रत्न दिल्ली, अनाथ पिंडक इंटरनॅशनल अवॉर्ड- कर्नाटक, धम्म गौरव पुरस्कार- नासिक, दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतळगिरी कडून गौरव सन्मान, पत्रकारिता चे सतत तीन दर्पण पुरस्कार, असे अनेक पुरस्काराची दखल घेऊन “भारत ज्योती अवॉर्ड २०२१” हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रमाला तामिळनाडू च्या राज्यसभा खासदार डॉ शशिकलापुष्पा रामास्वामी, काँग्रेस चे वरिष्ठ नेता मेजर वेद प्रकाश,पूर्व कुलगुरू तामिळनाडू डॉ बी रामास्वामी, हरियाणा चे माहिती आयुक्त लेफ्ट. जनरल के जे सिंह. कार्यक्रमाचे आयोजक गुरूप्रित सिंह आदी उपस्थित होते.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व मित्र परिवार आणि सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.