दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी
बातमी मराठवाडा

दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी

नांदेड : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त मुस्लिम समुदायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकानासह गाड्याचे नुकसान झाले,असून यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा जखमी झाले.यात पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुपार नंतर जमावाने नांदेड शहरातील पावडेवाडी नाका,शिवाजी नगर व देगलूर नाका भागात दगडफेक करत दुकानांचे नुकसान केले.यावेळी काही गाड्यावर ही दगडफेक करून नुकसान करण्यात आले.या घटनेनंतर व्यापार्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

देगलूर नाका भागात जमावाने मोठी दगडफेक करत दहशत माजवली,यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने केलेल्या दगडफेकीत इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरवाडे हे जखमी झाले.याच सोबत काही पोलीस कर्मचाऱ्यांना दगडांचा मार बसला. जमावाला पागविण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नलकाड्या फोडण्यात आल्या. पोलिसांकडून संशयित आरोपींचे धरपकड सुरू केली आहे.