प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं संपत्तीच्या वादातून अपहरण
बातमी विदेश

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं संपत्तीच्या वादातून अपहरण

इस्लामाबाद : पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिव्हीवरील प्रसिद्ध प्रेजेंटर मीरा सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. मीराला भारतात तिच्या विनोदी व्हिडीओसाठी ओळखले जाते. अशात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मीराला पाकिस्तानात जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरावर हल्ला झाला आहे आणि तिच्या आईचं अपहरण करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मीराच्या लाहोर येथील घरात मंगळवारी मोठी घटना घडली. याबाबत अभिनेत्रीने सांगितलं की, काही जण माझी प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे. तिच्याविरोधात कारस्थानही केलं जात आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र डेली जंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, मीराने पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. येथे अभिनेत्रीने सरकारने स्वत: आणि कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. यासोबत अभिनेत्रीने कॅपिटल सिटी पोलीस ऑफिसमध्ये या घटनेबाबत अर्ज दाखल केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, कशा प्रकारे त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि तिच्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे.

मीराने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटातदेखील काम केलं आहे. मीराने अलीकडेच एक्सप्रेस ट्रिब्यूनशीही संवाद साधला. त्यांनी आपल्या खास बातचीतमध्ये सांगितलं की, मला मियां शाहिद मेहमूद नावाच्या व्यक्तीकडून धोका आहे. त्याला माझी जमीन बळकावयची आहे. त्याला माझी मालमत्ता घ्यायची आहे. आता त्याने माझ्या आईचेही अपहरण केले आहे. लाहोर पोलिसांना अर्ज लिहिले असल्याचे मीराने सांगितले आहे. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीही मदत घेतली आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिलं आहे की, मी पाकिस्तान सरकारकडे मदत मागत आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केला ते शाहिद महमूद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, मीराच्या आईकडून मी संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याचे सर्व पैसे मी त्यांना दिले आहेत. मात्र जेव्हा मी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट मागितले तेव्हा मला ते देण्यात आले नाही.