स्वतःचे स्पर्म वापरून डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप!
बातमी विदेश

स्वतःचे स्पर्म वापरून डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप!

मिशिगन : एका प्रतिष्ठित फॅमिली डॉक्टरने पालकांच्या नकळत, स्वत:चे स्पर्म वापरून शेकडो बाळांना जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. फिलीप पेवन डेट्रॉइट, मिशिगन इथं राहतात. त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या कार्यकाळात असंख्य महिलांची बाळांतपणं करत तब्बल ९००० बाळांना या जगात आणल्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही भावंडांनी मिळून ऑनलाइन डीएनए चाचणी केली. त्यात त्यांना त्यांचे डीएनए पेवन यांच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात आलं. पेवन हे त्यांच्या वडिलांचे डॉक्टर होते. आता पेवन हेच आपले वडिल असल्याची शक्यता या मुलांनी वर्तवली आहे. या भावंडांपैकी एकजण, जेमी हॉल, ही डिसेंबर २०१९ मध्ये पेवन यांच्याकडे गेली. या भेटीत पेवन यांनी ते जेमीचे वडिल असून त्यांनी स्वत:चे स्पर्म्स वापरत आणखीही बरीच बाळं जन्माला घातल्याची कबूली दिली. स्त्रीरोगतज्ञासह स्पर्म डोनर म्हणून काम करताना त्यांनी हे केल्याचं कबूल केलं आहे.

जेमीनं सांगितलं की, ‘पेवन आमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यांनी स्वत:चे स्पर्म वापरल्याची माझ्या पालकांना किंचीतही कल्पना नव्हती. शिवाय तिनं टेस्ट केल्यावर आणखीही अनेकांसोबत तिचे डीएनए जुळले.’ पेवनच्या माध्यमातून जन्मलेली आणखीही अनेक भावंडं सापडतील असा तिचा अंदाज आहे. जेमी पुढे सांगते, ‘आमच्या सर्वांचा जन्म एकाच दवाखान्यात झाला. आमच्या जन्म दाखल्यांवर वडिल म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून पेवन यांचे नाव आहे.’

23 and me आणि ancestry.com या दोन सेवांच्या माध्यमातून जेनीनं हा शोध लावला. २००८ पर्यंत जेमीला आपले पालक कोण आहेत याची शंका आली नव्हती. मात्र एकदा तिच्या सावत्र बहिणीनं जेन आणि तिची मोठी बहिण लिनला सांगितलं, की त्यांना मोठं करणारा माणूस हा त्यांचा जैविक पिता नव्हता. मग तिनं २०१७ मध्ये पितृत्व चाचणी केली त्यात हे सत्य समोर आलं. जेनच्या म्हणण्यानुसार पुढच्या काळात तिला असंख्य फोन आणि इमेल आले ज्यात त्या व्यक्तींनी त्यांचे डीएनए जेनशी मिळतेजुळते असल्याचा दावा केला. डॉ. पेवनचं वय आता १०४ वर्ष असून ते अजूनही मिशीगनमध्ये राहतात. त्यांनी या कृत्याबाबतची कबुली या सगळ्या व्यक्तींना दिली आहे.