शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?
बातमी महाराष्ट्र

शिवसेना नेत्याचा आलिशान बंगला पाडला; पुढचा नंबर या नेत्याचा?

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. मिलिंद नार्वेकर याच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3 मध्ये येत असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता हा आलिशान बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, करून दाखविले, मिलिंद नार्वेकर यांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो तोडण्याचे काम आत्ता सुरू झाले. उद्या २३ ऑगस्ट रोजी मी दापोलीला जावून प्रत्यक्ष ह्या तोडकामाची पाहणी करणार आहे. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असेल.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड दापोली समुद्र किनार्यावर CRZ कायद्याच्या आत येणारा बंगाला तोडण्यात आला आहे. हा प्रशासनाने तोडला नसून स्थानिक बंगला मालकाने स्व:ताहून तोडल्याचे सांगण्यात येत आहे. सदर बंगला तोडायचा असल्यास प्रशासनाकडून आधी पूर्व सूचना देणारी नोटीस दिली जाते. पण अशी कोणतीही नोटीस सदर बंगल्याला मिळालेली नाही.