आटपाडीत मोदीसाठी लागली लाखोंची बोली; पण…
पश्चिम महाराष्ट्र बातमी

आटपाडीत मोदीसाठी लागली लाखोंची बोली; पण…

सांगली : आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात ‘मोदी’ नावाच्या बकऱ्याला ७० लाखांची बोली लागली आहे. आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर या बकऱ्याचं नाव मोदी असं ठेवण्यात आलं असून त्याच्या मालकाने तब्बल दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. खरेदीदारानं त्यांना जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. मात्र, मेतकरी यांना ते मान्य झालं नाही त्यामुळे हा बकरा अद्यापही विकला गेलेला नाही. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

या बकऱ्याच्या मालकाने कोट्यवधी रुपयांची बोली लावली होती. या बकऱ्याच्या मोदी या नावाच्या करिश्म्यामुळे एवढी मोठी बोली लागली असल्याचे सांगितले जात आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारातील ही घटना आहे.