राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुलेचा पहिला क्रमांक
बातमी महाराष्ट्र

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुलेचा पहिला क्रमांक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमध्ये मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१३ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.

एकूण ४२० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या २६ पदांचा यामध्ये समावेश होता. या परिक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे.