वरळीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू
बातमी मुंबई

वरळीत इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. वरळी भागातील अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. यादरम्यान लिफ्ट कोसळली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.