बातमी मुंबई

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!

मुंबई : आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी झाकिरला ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावत एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच प्रकरणात झाकिरला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री २ च्या सुमारास एटीएसचे वरीष्ठ अधिकारी देखील कार्यालयाबाहेर दिसून आले, तेव्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले. अखेर, रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published.