अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद
बातमी मुंबई

अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद

मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्सनां रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्स बंद होण्यास सुरवात झाली आहे. अधिकतर मोठ मोठे मॉल्स अवघे दोन दिवस सुरू होते, मात्र मंगळवारी पुन्हा मॉल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मॉल्स मालकांच्या नाकी नऊ आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे दोन डोस घेणं बंधनकारक असणार आहे. अनेक मॉल्सचे मालक आणि व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केवळ मौखिक आश्वासन दिलं होतं, जे पूर्ण झालं नाही. एक लशीचा डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रवेश देणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले होते. मात्र राज्य सरकारने १६ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, त्यांनी नियम अधिक कडक केले आहेत.

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या डोसच्या १४ दिवसांनंतरच त्यांना काम करण्याची परवानगी असेल. त्यामुळे मॉल्सचे मालक आणि व्यवस्थापकांनी सध्या मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.