मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा
बातमी मुंबई

मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा

मुंबई : पतंगाचा मांज्याने पोलिस अधिकाऱ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असतानाच अचानक नायलॉनचा मांजा गळ्याजववळ आला, पण दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. वेळ न गमावता त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रीय करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले पण सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात नाशिकमध्येही एक २३ वर्षांचा तरुण मांजामुळे जखमी झाला होता. तर, नागपूर शहरातही काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षांच्या मुलाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आणि तो गंभीर जखमी झाला.