धक्कादायक ! सैन्यदलातील जवानाचा पत्नीनेच केला खून; तिघांना अटक
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! सैन्यदलातील जवानाचा पत्नीनेच केला खून; तिघांना अटक

वाई : सैन्यदलातील जवानाचा खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील सैदापूर गावात घडली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानाचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी पत्नी, भावजय आणि मेहुणा यांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संदीप जयसिंग पवार हा भारतीय सैन्यदलातील जवान सुट्टीवर घरी आलेला असताना दारू पिऊन मारहाण करून व त्रास देत होता. त्रासाला कंटाळून त्याला पत्नी भावजय व मेहुण्याने २७ डिसेंबर रोजी लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारांसाठी पुणे येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना जवानाचा ३१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. अज्ञातांनी मारहाण करून खून केल्याची तक्रार वानवडी पुणे पोलिसात नातेवाईकांनी केली होती. गुन्हा दाखल करून सातारा मुख्यालयात वर्ग करण्यात आला होता.

या प्रकरणी गावामध्ये व परिसरात उलटसुलट चर्चा होत होती. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी या बाबत सखोल चौकशीचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे घरी जाऊन चौकशी करत असताना सुरवातीला कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन चौकशी करत असताना जवानाला मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता पुणे येथे दाखल केले व वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताने मारहाण करून खून केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला अशी कबुली नातेवाईकांनी दिली. हा खून मृत सैनिकाची पत्नी, भावजय आणि मेहुण्याने केला असल्याचे तपासात समोर आले आहे.