सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा; नागपूर कनेक्शन आले समोर
बातमी महाराष्ट्र

सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा; नागपूर कनेक्शन आले समोर

मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून याचा संबंध आता राज्य सरकारच्या अखत्यारित सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाशी जोडण्यात आला आहे. न्यूज १८ लोकमतेने दिलेल्या वृत्तानुसार कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेल्या 20 कांड्या त्याच जिलेटिनच्या कांड्या आहेत, ज्याचा वापर महामार्ग बनवण्याकरता केला जात आहे. या कांड्या नागपूरमधील एका कंपनीत बनवल्याचंही उघड झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संबंधित जिलेटिनच्या कांड्या स्कॉर्पिओ गाडीत कशा आल्या? किंवा या कांड्या सचिन वाझेला कोणी दिल्या? याचा तपास एनआयएकडून केला जात होता. याप्रकरणी एनआयएने नुकतीच एका माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची चौकशी केली आहे. या चौकशीत ठाण्यातील एका व्यावसायिकाचा संबंध उघड झाला आहे. संबंधित माजी पोलीस अधिकाऱ्याचे ठाण्यातील व्यावसायिकाशी आणि सचिन वाझेशी घनिष्ठ संबंध आहेत.

ठाण्यातील हा व्यावसायिक या महामार्गाच्या कामाशी संबंधित असून त्याला या महामार्गासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या चोरून आणणं सहज शक्य होतं. त्यामुळे या व्यावसायिकावर जिलेटिनच्या कांड्या आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच महामार्गाच्या कामातील 20 जिलेटीनच्या कांड्या संबंधित व्यावसायिकाने चोरल्या होत्या. तसेच या कांड्यांचा वापर कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्याकरता झाला होता.