नांदेडकरांसाठी मोठी बातमी ! दुसरी लाट थोपवण्यात मोठे यश
बातमी मराठवाडा

नांदेडकरांसाठी मोठी बातमी ! दुसरी लाट थोपवण्यात मोठे यश

नांदेड : महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला. अन्य जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्हादेखील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ होता. पण तब्बल 55 दिवसांच्या प्रयत्नानंतर नांदेड जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून नांदेडकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यापूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार निर्माण झाला होता. तेव्हा विदर्भाला लागून असलेल्या सीमांवर तपासणी सुरू करण्यात आली. 12 मार्च रोजी 360 रुग्ण आढळले. त्यावेळी हा आकडा मोठा होता. प्रशासनाने तेव्हाच कडक निर्बंध लावले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. रुग्णसंख्या वाढतच गेली. 23 मार्च रोजी 1333 रुग्ण आढळले आणि स्थानिक प्रशासनाने टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

रुग्ण मोठ्या संख्येत वाढत असतानादेखील बेड आणि ऑक्सिजनची कमरता भासली नाही. 6 एप्रिल ते 11 एप्रिल या पाच दिवसात 8 हजार 507 रुग्ण आढळले. आरोग्य विभागावर मोठा ताण निर्माण झाला. रुग्ण वाढत असताना देखील ‘टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट’ ही मोहीम प्रशासनाने राबवली. नंतर 15 एप्रिलपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. एप्रिलच्या शेवटी मात्र नांदेडमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी फरक पडला. मागील पाच दिवसापासून 500 पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारने लावलेल्या टाळेबंदी आणि ब्रेक द चेन मोहिमेला फायदा झाला असे म्हणावे लागेल.