नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान
देश बातमी विदेश

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या वतीने हा सन्मान मोदींना हा अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. तर पंतप्रधान मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी स्वीकारले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विटर संदेशांच्या मालिकेत त्यांनी म्हंटले आहे की, “अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिजन ऑफ मेरिट पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे मला मनापासून गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या लोकांच्या प्रयत्नांना यामुळे मान्यता मिळाली आहे, हे भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीबद्दल उभय देशांमधील द्विपक्षीय सहमती दर्शवते.

एकविसाव्या शतकात अभूतपूर्व आव्हाने तसेच संधी दोन्ही आहेत. संपूर्ण मानवतेच्या हितासाठी जागतिक नेतृत्व प्रदान करण्यासाठी आपल्या लोकांच्या अद्वितीय सामर्थ्याच्या विपुल क्षमतेचा भारत-अमेरिका संबंधांना फायदा होऊ शकतो. भारताच्या 1.3 अब्ज जनतेच्या वतीने, भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकन सरकार आणि उभय देशांतील इतर सर्व भागधारकांसोबत काम सुरू ठेवण्याचा माझ्या सरकारचा दृढ निश्चय आणि बांधिलकीचा मी पुनरुच्चार करतो. ”

पंतप्रधान मोदींसह हा पुरस्कार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही देण्यात आला.आबे यांना पॅसिफिकमध्ये सुरक्षितता राखण्यासाठी आणि मोरिसन यांना ग्लोबल चॅलेंजसवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी हा सन्मान देण्यात आला.
20 जुलै 1942 रोजी अमेरिकन संसदेने (कॉंग्रेस) लिजन ऑफ मेरिट मेडलची सुरुवात केली होती. हा अवॉर्ड अमेरिकेतील सैनिकांव्यतिरिक्त विदेशातील अशा सैनिकांना आणि राजकारण्यांनाही दिला जातो. ज्यांनी असाधारण सेवा दिल्या आहेत.