भय इथले संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

भय इथले संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरात तर आकडेवारी चिंताजनक आहे. मृत्यूदरही वाढत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रभाग 24 मधील विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहात होत्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 4294 रुग्णांनी वाढ झाली आहे. हा आकडा मोठा आहे, वेळीच गांभीर्य न लक्षात घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. शनिवारी दिवसभरात नाशिकमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून अवघ्या तीन दिवसांत 100 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत बळींची संख्या 2651 वर गेली आहे.

एकट्या नाशिक शहरात शनिवारी दिवसभरात 2087 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शहरात 10 एप्रिल रोजी बळींची संख्या 15 होती. नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.परंतु, रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून वणवण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही.