A-S_NEET
देश बातमी

NEET मध्ये शोएब आणि आकांक्षा यांना सारखेच गुण; पण शोएबच का टॉपर? तर जाणून घ्या…

नवी दिल्ली : NEET परीक्षेचा निकाल काल (शुक्रवार) जाहीर झाला. यामध्ये शोएब आफताब या विद्यार्थ्याने अव्वल स्थान मिळविले. शोएब याला 720 पैकी 720 गुण मिळाले. शोएब याच्यासह आकांक्षा सिंह या विद्यार्थीनीलाही 720 पैकी 720 गुण मिळाले. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

NEET result 2020 to be announced today at ntaneet.nic.in; here's how to  check result online | India News | Zee News

आकांक्षा आणि शोएब या दोघांना सारखेच गुण मिळाले तरीही शोएबच अव्वल कसा आला तर याचं उत्तर आता मिळाले आहे. जर दोन्ही विद्यार्थ्यांचे एकसारखे गुण मिळविले असतील तर गुण आणि विषयांनुसार याचे अंदाज बांधला जातो. जर तरीदेखील कोणत्या एका विद्यार्थ्याला अव्वल क्रमांक द्यायचा असेल तर त्यांच्या वयाचा विचार केला जातो.

शोएब आणि आकांक्षा या दोघांच्या बाबतही अशाचप्रकारचा विचार केला गेला आहे. शोएब आणि आकांक्षा प्रत्येक गुण आणि विषयांबाबत एकसमान गणले गेले. त्यामुळे आता त्यांच्याबाबत वयाचा फॅक्टर महत्वपूर्ण बनला आहे. त्यानुसार शोएब टॉपर बनला आहे.

दरम्यान, शोएब आणि आकांक्षा हे एकमेव उदाहरण नाही तर यापूर्वीही अशाच प्रकारची परिस्थिती समोर आली होती. त्यानंतर आता ही नवी माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत