तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…
देश बातमी

तुमचा मुलगा अभ्यास कमी पडतोय, लक्ष द्या! पालकांकडे तक्रार करणाऱ्या गर्भवती शिक्षिकेवर ४० विद्यार्थ्यांकडून हल्ला, अपशब्द वापरले अन्…

गुवाहाटी: देशातील विविध भागातून शिक्षकांसोबत गैरवर्तणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आसाममधील डिब्रूगढ जिल्हात घडली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या एका गटाने ५ महिन्याच्या गर्भवती महिला शिक्षिकेशी गैरव्यवहार केला. विद्यार्थी या गोष्टीवरून नाराज होते की, त्यांच्या खराब शैक्षणिक कामगिरीबद्दल संबंधित शिक्षिकेने पालकांकडे तक्रार केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाईकरत संबंधित सर्व विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली. तर शालेने या सर्व २२ जणांना निलंबित केले आहे. ही घटना जवाहर नवोदय विद्यालयातील आहे. शाळेचे मुख्याध्यापक रतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना रविवारी संध्याकाळी घडली.

कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत शिक्षक आणि पालकांची बैटक होती. बैठकीसाठी विद्यार्थ्यांचे आई-वडील आले होते. या बैठकीत इतिहास विषयाच्या शिक्षिकेने २२ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगतीवरून पालकांकडे तक्रार केली होती.

नेमक काय झालं

रविवारी संध्याकाळी ४० ते ५० विद्यार्थ्यांच्या गटाने पाच महिन्याची गर्भवती असलेल्या महिला शिक्षिकेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कुमार यांनी सांगितले की, शिक्षिकेला जेव्हा मुलांनी घेरले त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्यांना रुग्णालयात न्यावे लागले.

या प्रकरणी दोन विद्यार्थी मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी ४० ते ५० जणांना गोळा केले. हे सर्व जण इयत्ता १०वी आणि १२वीचे विद्यार्थी आहेत. या सर्वांनी संबंधित शिक्षिकेला अपशब्द देखील वापरले.

मुख्य आरोपी असलेल्या विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, शिक्षिकेने आम्हाला अतिशय नम्रपणे मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सांगितले होते. आमचा मुलगा अभ्यासात नीट लक्ष देत नाही, त्याचा योग्यरित्या अभ्यास करा आणि काळजी घ्या असे शिक्षिकेने म्हटले होते. पण त्यानेच शिक्षिकेवर हल्ला करण्याची योजना आखली.

चौकशीचे आदेश…
या प्रकरणी डिब्रुगढचे जिल्हा न्यायदंडाधिकारी बिस्वजीत पेगू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेच्या अधिकाऱ्यांनी दोघा आरोपींची ओळख पटवली आहे. हल्ला करणाऱ्या गटाचे नेतृत्व करणाऱ्यासह २२ जणांची यादी तयार करण्यात आली. या सर्वांवर रॅगिंग, शिक्षकांना शिविगाळ आणि शाळेच्या परिसरात मद्य आणल्याची तक्रार आहे. मुलांच्या गटाने महिला शिक्षिकेच्या पोटातील बाळाला दुखापत होईल असे काही करण्याआधी त्यांना वाचवण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले.