संजय राऊत, कंगनाला न्यायालयाची समज, म्हटले…
देश

संजय राऊत, कंगनाला न्यायालयाची समज, म्हटले…

मुंबई- शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील मतभेद न्यायालयात पोहोचले आहे. त्यावरून न्यायलायने कंगनाच्या बाजूने कौल देत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना समज दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर करून केलेली कारवाई मान्य केली जाऊ शकत नाही,  असं सांगत उच्च न्यायालयानं कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच कारवाईची नोटीस आणि आदेश रद्द केले.

या निर्णयासह न्यायालयाने या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत व कंगना रणौत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून समज दिली.  मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या तसेच विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या कंगनालाही न्यायालयाने समज दिली. तर कायदा सर्वश्रेष्ठ आहे, याची पर्वा न करता संजय राऊत यांनी कंगनाला धडा शिकवण्याची भाषा केली. असे आचारण एका पक्षाच्या नेत्याला आणि खासदाराला शोभत नाही,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. एका पक्षाच्या नेत्याला आणि खासदाराला शोभत नाही,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली.