लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण
पुणे बातमी

लसीचे दोन्ही डोस घेऊनही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. अशात लसीकरणांवर भर दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असं ट्वीट कोल्हे यांनी केले आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ कोरोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.