कोरोना नियमावलीबाबत उत्तरप्रदेश सरकारचा मोठा निर्णय
देश बातमी

कोरोना नियमावलीबाबत उत्तरप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ : कोरोना नियमावलीबाबत उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणाऱ्यांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं आता अनिवार्य असणार आहे. योगी सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर हा ३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच हा रिपोर्ट चार दिवस जुना असला तरच ग्राह्य धरला जाणार आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित राज्यातून उत्तर प्रदेशात आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितलं आहे. तसेच अँटिजेन टेस्ट आणि थर्मल स्कॅनिंग करण्यास सांगितलं आहे.

कोरोना रोखण्यासाठी देण्यात आलेल्या नियमावलीचं सक्तीनं पालन करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी कावड यात्रा रद्द केली आहे. पुढचे काही दिवस महत्त्वाचे असल्याने उत्तर प्रदेश सरकारनं आतापासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.