अंबानी धमकी प्रकरणात नवी माहिती; वाझेचा तो प्लॅन ऐनवेळी फसला
बातमी महाराष्ट्र

अंबानी धमकी प्रकरणात नवी माहिती; वाझेचा तो प्लॅन ऐनवेळी फसला

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून एनआयएने अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या मोठ्या कटाचा उलगडा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सचिन वाझे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी दोघांची हत्या करुन त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सचिन वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला असून हा या प्रकरणातील महत्वाचा पुरावा ठरु शकतो. एनआयए सध्या या प्रकरणात एन्काऊंटरचा काही प्लॅन होता का याची माहिती घेत आहे. सचिन वाझेचा पासपोर्ट सापडला आहे. त्याच्यासह आणखी एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट आखला होता. यानंतर अंबीनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरेलेल्या वाहन प्रकरणात त्यांना गुंतवलं जाणार होतं.

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलं होतं. कटानुसार, एनआयएने ओळख उघड करण्यास नकार दिलेल्या त्या दोन व्यक्तींची त्याच दिवशी हत्या केली जाणार होती. नंतर सचिन वाझे प्रकरणाचा उलगडा केल्याचं श्रेय घेणार होते. १७ मार्चला सचिन वाझेंच्या घरावर धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता.