पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा
पुणे बातमी

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून सोबत असणाऱ्या २ मित्रांनी धक्कादायक दावा केला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला आहे. याबाबत पूजाचे मित्र असलेल्या दोन तरुणांनी पोलीस जबाबात ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे पोलिसांनी अरूण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत. तसंच मुलीच्या आई वडिलांचेही जबाब नोंदवले. यामधून पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येत आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पुणे पोलीस तपास करणार करणार आहेत.

पूजा चव्हाण हिची छोटी बहिण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात तिने म्हटलं आहे की, माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल. ‘दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहिण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे,’ असं दिया चव्हाण हिने म्हटलं आहे.

पूजा चव्हाण हिचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर आणि मणक्याला जखम असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मणक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला, अशी शक्यता आहे. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की आणखी काही..याबाबत अद्याप नेमका खुलासा झालेला नाही.