#लव्हजिहाद: हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी त्याने केले धर्मांतर; उच्च न्यायालयाने दिले संरक्षण
देश बातमी

#लव्हजिहाद: हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी त्याने केले धर्मांतर; उच्च न्यायालयाने दिले संरक्षण

हरियाणा : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यसरकारच्या लव्ह जिहाद विरोधात कायदे करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र अशातच हरियाणातील यमुनानगर मधून एक लव्ह जिहादची एक घटना समोर आली आहे. यमुनानगरमध्ये एका तरूणाने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला आहे. या तरूणाने एका मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला आणि काही दिवसातच त्याने हिंदू मुलीशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्नदेखील केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणातील मुलगी 19 वर्षांची आहे तर मुलगा 21 वर्षांचा आहे. मुलगा एका खासगी कंपनीत कामाला असून त्याला १५ हजार रुपये वेतन आहे. मुलाच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य आहे परंतु मुलीच्या कुटुंबियांकडून या लग्नाला प्रचंड विरोध आहे. मुलीचे कुटुंबिय या दोघांना जीवे मारण्याची आणि मुलीच्या कुटुंबियांना त्रास देण्याची धमकी देत आहेत. तर मुलीला कैद करू शकतात. असे सांगत या जोडप्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या दोन्ही जोडप्यांना यमुनानगरच्या पोलिसांकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी दोघांनीही मुलीच्या कुटुंबियांच्या इच्छेविरोधात मंदिरात लग्न केले. या दोघांच्याही लग्नाची माहिती मुलीच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी त्या जोडप्याला धमकावण्यास सुरवात केली. या लग्नाचा परिणाम भोगण्यासाठी तयार व्हा आणि आणि संधी मिळताच आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी मुलीच्या कुटुंबीयांनी दिल्याचा आरोप मुलाने केला आहे. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणात या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहे.