NSA अजित डोवाल यांच्या जीवाला धोका; घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ
देश बातमी

NSA अजित डोवाल यांच्या जीवाला धोका; घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घर आणि कार्यालयाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून एनएसए डोवाल यांच्या जीवाला धोका आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर या संपूर्ण प्रकाराबद्दल सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचित करण्यात आले आहे. जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिक याच्या चौकशीतून डोवाल यांच्या कार्यालय परिसराची व्हिडिओच्या माध्यमातून टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे २०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइक च्या मोहिमेत डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासूनच अजित डोवाल पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत.

तर जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा तो प्रमुख आहे. हिदायत-उल्लाह मलिक शोपियनचा रहिवाशी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अटक करण्यात आली. जम्मूच्या गानग्याल पोलीस ठाण्यात मलिक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.