देश बातमी

दिल्लीतील स्फोटामागे ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी; तपास यंत्रणांकडून पडताळणी सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायली दूतावास परिसरात झालेल्या कमी क्षमतेच्या बॉम्बस्फोटाची जैश उल हिंद या संघटनेनं जबाबदारी घेतली आहे. टेलिग्राम चॅटमधून ही माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे. या आधी एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. त्यातून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीतील इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर एक ब्लास्ट झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे माहिती उघड झाली होती. येथून जाणाऱ्या एका कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं. ज्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. या स्फोटामुळे तीन गाड्यांचं नुकसान झालं होतं. सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाला होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन स्फोटाच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाच्या जवळून एक कार गेली होती. या कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं होतं. रस्त्यावर झाडांजवळ जाऊन हे पॅकेट पडलं आणि काही वेळात स्फोट झाला. स्फोटासाठी वापरण्यात आलेलं सामान दिल्लीतील लोकल मार्केटमधून खरेदी करण्यात आलं होतं. कारवर बॉल बेअरिंगचे निशाण सापडले होते.

हा आईडी ब्लास्ट होता, मात्र स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. म्हणजे यामध्ये ज्या विस्फोटकांचा वापर केला होता, त्याचं प्रमाण वा त्याची इंटेसिंटी जास्त नव्हती. विजय चौकापासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्ब स्फोट झाला. विजय चौकवर बिटिंग रिट्रिट या सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. आईडीच्या स्वरुपातील ही स्फोटकं प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाड्यांच्या काचा फुटल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *