भटक्या जनावरांच्या जेवणासाठी ६० लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

भटक्या जनावरांच्या जेवणासाठी ६० लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोना संकटातही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक धडाडीने निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. आता पटनायक यांनी भटक्या जनावरांसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांच्या अन्नसाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ अधिसूचित क्षेत्र परिषदेत देण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वच्छ कारभार आणि ग्रामीण भागात लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवल्यानेच नवीन पटनायक हे यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कामामुळे जनतेनं कायमच त्यांच्यावर प्रेम केलं. त्यामुळे इतकी वर्षे ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. आता भटक्या जनावरांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होत आहे.

सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपदावर राहिल्याने त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. नवीन पटनायक यांनी वडिलांच्या निधनानंतर १९९७ साली बीजू जनता दल पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यात सत्ता खेचून आणली. त्यानी पहिल्यांदा भाजपासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवली. त्यानंतर २००९ पासून आतापर्यंत स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढत आहेत. २०१४ आणि २०१९ लोकसभेच्या निवडणुकीतही बीजू जनता दलने चांगली कामगिरी केली आहे.