पाकिस्तानातील हिंदू मुलींचं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन चिंतेचा विषय
बातमी विदेश

पाकिस्तानातील हिंदू मुलींचं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन चिंतेचा विषय

नवी दिल्ली : रिपब्लिकन खासदार स्टिव्ह चाबोट यांनी तालिबानला मदत करण्यात पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजाबाबत अमेरिकन खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. जबरदस्तीनं होणारं धर्मपरिवर्तन चिंतेचा विषय असल्याचं अमेरिकेचे खासदार स्टीव्ह चाबोट यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समाजावर छळ होत आहे. पाकिस्तानात हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे. तसेच अल्पवयीन हिंदू मुलींचं वृद्ध मुस्लिम पुरुषाशी लग्न लावणे, असे अत्याचार सुरु आहेत, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे खासदार स्टीव्ह चाबोट यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी लाहोरपासून ५९० किलोमीटरवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली होती. हल्लेखोरांजवळ काठ्या, दगड आणि विटा होत्या. त्यांनी धार्मिक घोषणा देत मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळला होता. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध केला होता.