राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यात दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजारांच्या वर गेली आहे. अशातच राज्यातील काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा अंशतः लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यानंतरही कोरोना रुग्ण वाढले तर कडक लॉकडाऊन लावण्यात येईल,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

असे असतील नवे नियम?
– प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन
– राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय राहणार बंद
– शहरातील विवाह सोहळे होणार नाहीत
– वाचनालय अध्ययन कक्ष 50 टक्के क्षमतेत राहतील सुरू
– हॉटेल रात्री नऊनंतर बंद होतील, होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू
– बुधवार पासून जाधववाडी मंडी पुढील सात दिवस पूर्णपणे राहणार बंद