संगमनेर : राज्यात कोरोनाचं संकट वाढत असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नियमांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी जमा केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
संगमनेर शहरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी गर्दी करण्यास मनाई केली असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.
VIDEO: संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल#Sangamner #Ahmednagar #AttackonPolice pic.twitter.com/gqoIN0v9Ed
— Pravin Sindhu Bhima Shinde 🇮🇳✊ (@PravinSindhu) May 7, 2021
दिल्ली नाका परिसरात गुरुवारी सायंकाळी काही लोकांनी गर्दी केली होती. संचारबंदी असल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी यावेळी गर्दी केल्याबद्दल जाब विचारल्याने संतप्त जमावाने त्यांच्यावर थेट हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे.