फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन
बातमी विदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे अकाऊंट बंद केले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, युएस संसदेवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या अभुतपूर्व गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसक घडामोडींमुळे अशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी खबदारी म्हणून ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

भविष्यात भडकावू ट्विटमुळं अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, तसेच, ‘@realDonaldTrump’ या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कारण देण्यात आलं.

दरम्यान, युएस संसदेत झालेल्या घटनेनंतर सुरवातीला 12 तासांसाठी ट्रम्प याचं ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आलं होतं. तसेच, भडकावू ट्विट करण्याचं सत्र असंच सुरु राहिल्यास अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी ताकिदही त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी ही बाब गांभीर्याने न घातल्यामुळे अखेर त्यांच्या अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई करण्यात आल्याच ट्विटरने स्पष्ट केले आहे.

तात्पुरत्या बंदीच्या कारवाईनंतर ट्रम्प ट्विटर पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कालावधी संपुष्टात येत असल्याची बाब अधोरेखितही केली. शिवाय शांततापूर्ण सत्तांतराकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पण, जो बायडन यांच्या नव्या कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या नाहीत. तसेच, शपथविधीसाठी जाणार नसल्याचाही उल्लेख केला. तथापि, आता ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित केल्यानंतर ट्रम्प यांच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.