कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
उत्तर महाराष्ट् बातमी

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने दिलासा दिला होता. पण, आता उच्च न्यायालयात सरकारी पक्षाकडून याचिका दाखल झाल्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र इंदोरीकर यांच्या वकिलांचे म्हणणे रास्त ठरवत जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना निर्दोष मुक्त केलं होतं.

इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी एक्ट नुसार गुन्हा असल्याची बाजू सरकार आणि अंनिसच्या वतीने मांडण्यात आली मात्र इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला होता. ‘आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद घालायला हवा, असं म्हणत निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता त्या पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनेही जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. गुरूवारी सरकारी पक्षाच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.