सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर
देश बातमी

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी दरवाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाववाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून, मुंबईत पेट्रोल ९० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. देशभरात सोमवारी पेट्रोलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. नव्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

देशातील काही शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई व जयपूर – ९० रुपये
दिल्ली – ८३.७१ रुपये
कोलकाता – ८५ रुपये
चेन्नई – ८५ रुपये
बंगळुरू – ८५ रुपये
हैद्राबाद – ८५ रुपये
पाटणा – ८५ रुपये
या शहरासह देशातील इतर शहरात पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५ रुपयांवर गेले आहेत.