पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
देश बातमी

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (ता. २९) पुन्हा एका पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटरचाल दर झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर येथे पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विकले जात आहे. मे महिन्यात आतापर्यंत १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. परंतु कपात एकदाही झालेली नाही. ज्यामुळे पेट्रोल ७७ पैसे आणि डिझेल ७४ पैसे स्वस्त झाले. पण ४ मेनंतर पुन्हा किंमती वाढण्यास सुरवात झाली आणि मे महिन्यात पेट्रोल ३.५९ रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर या महिन्यात डिझेलमध्ये प्रतिलिटर ४.१३ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर
देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात. आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.