दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर
देश बातमी

दोन दिवसांनंतर पुन्हा भडकल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दोन दिवसांनंतर पेट्रोल डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. पाच राज्याच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत असून दोन दिवस किमती स्थिर होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा किंमतीत वाढ होताना दिसत असून राज्यात आज काही ठिकाणी पेट्रोल १००च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि आजच्या वाढीसह मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहेत आजचे दर
आजच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.३४ रुपये केले आहेत. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.८० रुपये झाला आहे. मुंबईत तर पेट्रोल ९९.३४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९१.०१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.७१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९३.११ आणि डिझेलची किंमत ८६.६४ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर
देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण, देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात. आपल्याला दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.