मुंबईत पेट्रोल दरात मोठी वाढ; काय आहेत आजचे दर
बातमी मुंबई

मुंबईत पेट्रोल दरात मोठी वाढ; काय आहेत आजचे दर

मुंबई : कोरोनामुळे नागरिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. मात्र एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मे महिन्यात एकूण आठ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाचे दर स्थिर होते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर दरवाढ सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज दिल्ली-मुंबईमध्ये पेट्रोल दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज (ता. १४) पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रमी उंचावर आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

काय आहे आजचा दर?
मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.०९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.