२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर
देश बातमी

२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर मागील २७ दिवसांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे. आज रविवारी ३ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जागतिक बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या भावात किरकोळ वृद्धी दिसून आली होती. करोना लसीकरणाने वेग घेतला आहे. ज्यामुळे युरोपातील आर्थिक स्थिती सावरेल, अशा आशावाद बड्या गुंतवणूकदारांना वाटत आहे. परिणामी तेलाच्या भावात तेजी आहे.

अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्यातील दरवाढीने काही शहरांमध्ये पेट्रोल ९० रुपयांवर गेले होते. त्यामुळे सरकारवर टीका झाली होती. विविध माध्यमातून झालेल्या टीकेनंतर कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखली. ती सलग २७ व्या दिवशी कायम आहे. एकीकडे दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नसताना इंधन दरवाढ सुरुच राहिल्यास जनतेचा रोष वाढेल, याचा अंदाज असल्याने इंधन दर जैसे थे ठेवण्याने कंपन्यांनी प्राध्यान्य दिल्याचे कमाॅडिटी तज्ज्ञांचे मत आहे.

काय आहेत सध्याचे दर
शहर पेट्रोल डिझेल (आकडे रुपयांमध्ये)
मुंबई   ९०.३४ ८०.५१
दिल्ली  ८३.७१ ७३.८७
चेन्नई    ८६.५१ ७७.४४
कोलकाता ८५.१९ ७७.४४
बंगळुरु  ८६.५१ ७८.३१