फिलिपिन्समध्ये विमानाचा अपघात; २९ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

फिलिपिन्समध्ये विमानाचा अपघात; २९ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये एका लष्कराच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानात जवळपास ८५ जण प्रवास करत होते. दक्षिण फिलिपिन्समध्ये लँडिंग करत असताना या लष्कराच्या विमानाला अपघात झाला. याबाबतची माहिती फिलिपिन्सच्या लष्कर प्रमुखांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले असून सी-१३० विमान सुलू प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या विमानाचा अपघात झाला.

या दुर्घटनेनंतर या विमानाला आग लागली. या विमान अपघातातून आत्तापर्यंत ४०-५० जणांना वाचविण्यात यश आले आहे, असे लष्कर प्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी सांगितले. मात्र, आतापर्यंतचा मृतांचा आकडा २९वर पोहोचला आहे.