कोरोनावरील उच्चस्तरीय बैठकीमुळे पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द
देश बातमी

कोरोनावरील उच्चस्तरीय बैठकीमुळे पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचे तांडव सुरु आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यामुळेच हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

अनेक राज्यांना भासत असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचं उत्पादन वाढवणं, त्याच्या वितरणाचा वेग वाढवणं आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. २६ एप्रिलला, सातव्या टप्प्यात ५ जिल्ह्यातल्या ३६ जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.