पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर
पुणे बातमी

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर

पुणे : पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांच्या एका चाहत्याने एक छोटं मंदिर उभारलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण याठिकाणी येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही याठिकाणी लावण्यात आला आहे. या मंदिरातील मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी असून मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला आहे तर मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मोदींचं हे मंदिर उभारण्यासाठी ‘नमो फाऊंडेशन’ने मदत केली असून त्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात आलं आहे. हे मंदिर उभारण्यासाठी दीड लाख खर्च करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आल्यापासून येथे अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.