Farmers Protest : शेतकऱ्यांची परेड रोखण्यासाठी पोलिसांनी स्वीकारला अजब मार्ग
देश बातमी

Farmers Protest : शेतकऱ्यांची परेड रोखण्यासाठी पोलिसांनी स्वीकारला अजब मार्ग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण लागले असून प्रजासत्ताकदिनानिमित्त ट्रॅक्टर परेडचं आयोजनं केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे परिस्थिती चिघळली आणि त्यानं हिंसक रुप धारण केलं. दरम्यान, ही ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीसांनी अजब मार्ग स्वीकारला असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांची परेड रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवरच ठाण मांडले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून उसळलेल्या हिंसाचारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या मार्गावरुन जाणारी ट्रॅक्टर परेड रोखताना बळाचा वापर न करता एखाद्या सत्याग्रहाप्रमाणे पोलिसांनी रस्त्यावर बसणे पसंद केले.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.