पुजा चव्हाण प्रकरणाला वेगळे वळण; फडणवीसांसह ७ भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

पुजा चव्हाण प्रकरणाला वेगळे वळण; फडणवीसांसह ७ भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : पुण्यातील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले असून विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चित्रा वाघ, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या ७ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, आशिष शेलार, शांता चव्हाण यांच्यासह माध्यमावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजपनेते आणि माध्यम रोज बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे तक्रारकर्ते श्याम राठोड यांनी सांगितले. दुसरी तक्रार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा सचिव नेमीचंद भासू चव्हाण यांनी वाशीम शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.