मृत्युनंतर पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक व्हायरल
बातमी महाराष्ट्र

मृत्युनंतर पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक व्हायरल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणं लागताना दिसत आहे. एकीकडे या प्रकरणावरून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढत असताना दुसरीकडे पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. ही चर्चा विशेषत: साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात होतेय. मराठीच्या सार्वकालिन महान कादंबरीकाराबद्दल जी भाषा पूजा चव्हाणनं वापरली आहे त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा लहू चव्हाण नावानं पूजाचं फेसबूक अकाऊंट आहे. तिच्या फेसबुक अकाऊंटच्या कव्हर फोटोवर तिचे आईवडील आणि संजय राठोड एकत्र असतानाचा फोटो आहे. 18 जानेवारीला पूजा चव्हाणने शेवटची फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती लिहिले आहे की, ”8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजीनिअरिंगमध्ये येवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध करत आहे आणि हा नालायक खान्देशी लेखक “भालचंद्र नेमाडे” देशी दारू पिऊन त्यावर कादंबरी लिहीत आहे… असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध… अशा शब्दात तिने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली असून 2010 साली पॉप्युलर प्रकाशनानं ती प्रकाशित केली आहे. जवळपास 602 पानांच्या या क्लासिक पद्धतीच्या कादंबरीसाठी भालचंद्र नेमाडेंना सुवर्णमहोत्सवी ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. भारतीय भाषेतील साहित्यिक लिखानासाठी ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हा दिला जस असून तो देशातला सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. मात्र याच कादंबरीत नेमाडेंनी बंजारा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखान केल्याचा काही राजकीय मंडळी आरोप करत आहेत. त्याच्याविरोधात काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले गेले आहे. पूजाची फेसबूक पोस्ट त्याच संदर्भानं आहे.

काय म्हंटल आहे पूजा चव्हाणने तिच्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये?
8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा,जहाज बांधणी,इंजिनिअरिंग मध्ये येवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध करत आहे आणिहा नालायक खान्देशी लेखक “भालचंद्र नेमाडे” देशी दारू पिउन त्यावर कादंबरी लिहीत आहे… असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध..