मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…
कोकण बातमी

मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी (ता. मालवण) तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे (ता. कणकवली) या योजनांचे ऑनलाइन भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आज भराडी मातेला वंदन केले व करोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आंगणेवाडी येथील भराडी देवी मंदिरातील जत्रा आज साधेपणाने साजरी होत आहे. करोनाचं संकट असल्याने केवळ आंगणे कुटुंबीयांनाच यंदा जत्रोत्सवाला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चितच आनंद आहे. कोविड काळात आपण काम करत आहोत. सगळेजण एकत्र येऊन कोरोना नामक संकटाचा मुकाबला करतो आहोत. तुम्ही सहकार्य करत आहात म्हणूनच कारोनाची दुसरी लाट आपण थोपवू शकत आहोत, असे नमूद करत प्रशासनाच्या आवाहनाला भाविकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.

ते पुढे म्हणाले की, ”भराडी मातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो पण मी भराडी मातेला विनंती करतो की, माझ्या शक्तीचा कण न कण कोकणवासीयांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे’, असे सांगतानाच कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले,’ आंगणेवाडीची जत्रा ही कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आहे. मी लहानपणापासून या जत्रेबद्दल ऐकत होतो, गेल्यावर्षी तिथे मुख्यमंत्री म्हणून येता आलं याचं मला खूप समाधान आहे. यावेळी कोरोनामुळे आभासी पद्धतीने तुमच्याशी बोलत आहे. आभासी शब्द मला आवडत नाही पण पर्याय नाही. आज जरी मी तिथे तुमच्यात प्रत्यक्ष नसलो तरी मनाने मी तिथेच आहे.’